हेमांगी कवी (Hemangi Kavi) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील रोखठोक अभिनेत्री. स्वत:चे विचार परखडपणे मांडणारी बेधडक अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. अनेकदा ती यावरून ट्रोलही होते. काही दिवसांपूर्वी हेमांगी ‘बाई, बूब्स आणि ब्रा’ या पोस्टमुळे चर्चेत होती. यावरून अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं. हिच्या इतक्या बिनधास्त पोस्ट हिच्या घरचे वाचत नसतील का? असा प्रश्न हेमांगीच्या बिनधास्त पोस्ट वाचून चाहत्यांना नेहमी पडतो. आता खुद्द हेमांगीनेच यावर उत्तर दिलं आहे.होय, रक्षाबंधनानिमित्त हेमांगीने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टध्ये तिने तिच्या इतक्या बेधडक स्वभावामागचे कारण सांगितले आहे.
आपल्या या पोस्टमध्ये हेमांगीने लिहिलं, ‘मी सोशल मीडियावर जे काही लिहिते, व्यक्त होते किंवा कुठलेही फोटो, व्हिडिओ शेअर करते. त्यावर लोकांची हमखास एक प्रतिक्रिया असते. तुझ्या घरचे सोशल मीडियावर नाहीयेत का? घरचे म्हणजे खासकरून घरातील पुरुष मंडळी. बाबा आणि भाऊ. हो आहेत की! बाबा होते पण आता ते नाहीयेत. माझा भाऊ आहे सोशल मीडियावर आणि तो बघतो, वाचतो माझ्या सगळ्या पोस्ट. त्यावर दादाची एकच रिअॅक्शन असते. गुड ऑर बॅड. मी आहे तुझ्यासोबत, तुझं रक्षण करायला. लहानपणी राखी पोर्णिमेच्या दिवशी औक्षण करून एक धागा बांधायचा आणि मोबदल्यात जे काही मिळायचं/ मिळवायचं गिफ्ट. पैशांपासून ‘मी आहे तुझ्यासोबत’ हे गिफ्ट आणि पैशापलिकडे गेलेलं नातं खूप भारी आहे आणि म्हणूनच मी नाही घाबरत...
हेमांगी कवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने फक्त लढ म्हणा, डावपेच, कोण आहे रे तिकडे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ठष्ट, ती फुलराणी या नाटकांमधील तिच्या भूमिकेचे तर खूपच कौतुक झाले आहे.