Join us

रिअलमध्ये लाइफमध्ये मानसी नाईकचा असा आहे तामझाम, नटून थटून शेअर केले खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 4:47 PM

मानसी नाईकने १९ जानेवारी २०२१ रोजी प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली. प्रदीप हा एक प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीपसुद्धा खुपचं लोकप्रिय आहे.

मराठमोळी मानसी नाईक रिल लाइफमध्ये ज्यारितीने सुंदर दिसतो तितकेच सुंदर आणि लक्षवेधी रिअल लाइफमध्येही दिसावं असा खटाटोप मानसीचा असतो. त्यामुळे आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते. सणासुदीच्या दिवशी मानसी नाईकचा थाट हा पाहण्यासारखाच असतो. पारंपरिक पद्धतीच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये  ती अवतरते.मानसीने आपल्या स्टाईलच्या माध्यमातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कायमच केला आहे. 

मानसी नाईक सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या पतीसोबत नेहमीच खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करताना दिसते.आजदेखील मानसीने एक व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओत पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत आहे.  तिने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हातात लाल चुडा आणि मेहंदी काढल्याचे पाहायला मिळत आहे. हातावरच्या तिच्या मेहंदीनेच चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

मानसी इतकी नटून थटून कुठे जाते असा प्रश्न तुम्हाला पडला असणार पण, हरियाली तीज हा सण सर्वत्रच मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मानसीनेही या सणाचे खास सेलिब्रेशन केले आहे. पती प्रदीप खरेरासोबत तिने हा सण साजरा केला. लग्नानंतर मानसीचा तीज पहिल्यांदाच साजरी करते. त्यामुळे या खास सणाच्या दिवशी तिने साजश्रृंगार करत साजरा केलाय.

मानसी नाईकने १९ जानेवारी २०२१ रोजी प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली. प्रदीप हा एक प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीपसुद्धा खुपचं लोकप्रिय आहे. या दोघांचं लग्नसुद्धा मनोरंजन क्षेत्रात चर्चेचा विषय होता.मानसी नाईक आपल्या पतीसोबत सतत सोशल मीडियावर सक्रीय असते.

ती नेहमीच आपल्या खाजगी गोष्टी चाहत्यांशी शेयर करत असते.व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्याही वाहवा मिळवत असते. सोशल मीडियावर हे कपल एकमेकांवर प्रेमसुद्धा व्यक्त करत असतात. या दोघांनाही सोशल मीडियावर खुपचं पसंत केल जातं.

 

टॅग्स :मानसी नाईक