आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Manasi Naik). उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर मानसीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. मानसी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने समाजकार्य करतानाचा फोटो शेअर केला आहे.
अलिकडेच मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती काही लहान मुलांना जेवण वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रत्येक लहान मुलाच्या आणि मानसीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असल्याचं दिसून येत आहे.
मानसीच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून विशेष पसंती मिळत आहे. एकीकडे मानसी मुलांना जेवण वाढत आहे. तर तिच्या बॅकग्राऊंडला लता मंगेशकर यांचं जिंदगी प्यार का गीत हैं. हे गाणं सुरु असल्याचं ऐकू येत आहे.
दरम्यान, मानसी नाईकने २००६ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे कलाविश्वात पदार्रपण केलं होतं. तसंच ती ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतही झळकली होती. मात्र, मुख्य ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांमुळे तिला खरी ओळख मिळाली.