Join us

​अभिनेत्री नयना मुकेला 'फायनल डिसिजन'साठी मिळाला हा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 5:23 AM

अभिनेत्री नयनाने आजवर अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. गणपती बाप्पा मोरया या मालिकेतील तिच्या लक्ष्मी या भूमिकेचे ...

अभिनेत्री नयनाने आजवर अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. गणपती बाप्पा मोरया या मालिकेतील तिच्या लक्ष्मी या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. प्रेक्षकांची लाडकी नयना सध्या एका नाटकामध्ये झळकत असून या नाटकातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. एवढेच नव्हे तर या नाटकासाठी नुकतेच तिला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या नयना खूपच खूश आहे.नयना मुके 'फायनल डिसिजन' या नाटकात काम करत असून या नाटकात तिच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत. 'फायनल डिसिजन' या व्यावसायिक मराठी नाटकातील भूमिकेसाठी नयानाला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मुंबईतील मालाड येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. अनिल काकडे यांनी 'फायनल डिसिजन' या नाटकाचे लेखन - दिग्दर्शन केले आहे. देह दान या महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकामध्ये नयनाने साकारलेल्या रेणुका या भूमिकेचे विशेष कौतुक रसिकांकडून होत आहे. नयानाने या नाटकात काम करण्याआधी अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. देवयानी, गणपती बाप्पा मोरया या मालिकांमध्ये नयनाने काम केले असून तिच्या या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित अनवट, संजय जाधव दिग्दर्शित येरे येरे पैसा आदी चित्रपटांमध्ये नयनाने चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नयनाने अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर ती आता हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळणार आहे. एका हिंदी सिनेमात नयनाला प्रेक्षकांना एका महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नयनाने अभिनयासोबतच सूत्रसंचालनात देखील आपले भाग्य आजमावले आहे. नयनाचा आज वाढदिवस असून यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण तिच्या वाढदिवसाच्या काहीच दिवस अगोदर तिला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे यंदाचे वाढदिवस सेलिब्रेशन खास असणार यात काहीच शंका नाही.