सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री पर्ण पेठेविषयी सांगणार आहोत.
मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. अभिनेत्री पर्ण पेठेही त्यापैकी एक आहे. पर्ण लेखक दिग्दर्शक अतुल पेठे यांची कन्या आहे. त्यामुळेच अभिनयाचं बाळकडू पर्णला घरातूनच मिळालं. सध्या पर्ण वडिलांसोबत बिगडे बिंब या नाटकाच्या प्रयोगासाठी दिल्लीला गेलीय. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती चाहत्यांना दिलीय. सोबतचं दिल्लीत वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. बिगडे बिंब या नाटकाची संकल्पना आणि निर्देशन अतुल पेठे यांनी केलं आहे. या आधी 'अडलंय का?..' या नाटकात देखील पर्ण आणि अतुल पेठे यांनी एकत्र काम केलं होते. निपुण धर्माधिकारी याने या नाटकाचे दिग्दर्शन केले होते.
दरम्यान, पर्ण सध्या चारचौघी या नाटकात काम करत आहे. या नाटकात तिच्यासोबत मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम हे कलाकार दिसून येत आहेत. पर्णने मराठी सिनेमातून रसिकांची मनं जिंकली आहेत. 'विहीर', 'रमा माधव', 'वायझेड', 'फोटोकॉपी' अशा विविध सिनेमात विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत पर्ण पेठे तितकीच सजग आहे.