मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.नुकतीच प्राजक्ता एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचा काव्यसंग्रह प्राजक्तप्रभाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. ग्रंथाली प्रकाशित प्राजक्तप्रभा काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून भेटीला आली आहे. मात्र आता तिच्या एका खास कवितेमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिच्या बॉयफ्रेंडसाठी तिने ही कविता केली असून त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. काही वर्षापूर्वी प्राजक्ता माळी युरोप ट्रीपमुळे चर्चेत आली होती. तिच्या या यूरोप ट्रीपमधील एका मुलासोबतचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडबद्दल चर्चा सुरू झाली होती. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते.त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच तिच्या प्रेमाची कबुली दिलीय. इतकेच नाही तर तिने तिच्या बॉयफ्रेंडसाठी कविता लिहून प्रपोज केले होते.
आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तिने एक कविता लिहिली होती. प्रेमाचा रंग ओळखल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या पेनाने प्राजक्ताने ही कविता लिहीली होती. “प्यार, इश्क, मोहब्बत…ये लब्जभी…सरल शब्द जैसे, सरल नहीं…तो क्या इसके रास्ते और मंजिले क्या खाक सरल होंगे….” अशा ओळींची तिने ही कविता लिहिली होती.