Prajakta Mali: : प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते. तिच्या चित्रपटांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. तिच्या पर्सनल लाईफबद्दल ही लोकांना उत्सुकता असते. प्राजक्ताने अल्पावधीतच उत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नुकतंच तिचा 'फुलवंती'सिनेमा (११ ऑक्टोबर रोजी) प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान प्राजक्ताने तिच्या क्रशबद्दल सांगितले.
प्राजक्ताने 'फुलवंती' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक मुलाखत म्हटलं, "मी गश्मीरची फार मोठी चाहती आहे. तो माझा क्रश आहे. मी त्याची चाहती 'कॅरी ऑन मराठा' या सिनेमापासून आहे. मी सहसा कोणत्याच चित्रपटाच्या शोला वेळेच्या आधी जात नाही. पण मला माहित नाही, त्या चित्रपटाच्या शोला 'फर्स्ट डे फर्स्ट शो' गेले होते आणि थिएटरमध्ये १० मिनिटे आधीच जाऊन बसले होते. चित्रपट पाहण्यासाठी मी कोणासोबत गेले नव्हते, फक्त गश्मीरसाठीच मी चित्रपट पाहायला एकटी गेले होते"
पुढे प्राजक्ता म्हणाली, "तो चित्रपट पाहिल्यानंतरच गश्मीरसोबत काम करण्याची इच्छा होती. अनेकदा मनातल्या मनात मी गश्मीर महाजनीसोबत कामंही केलंय. पण मला, वाटलं नव्हतं की, मी निर्मिती केलेल्या पहिल्याच सिनेमात गश्मीरसोबत काम करेल. पण तो दिवस 'फुलवंती'ने दाखला. त्या सिनेमामुळेच आम्ही एकत्र काम केलं. याचा खूप आनंद आहे".
"गश्मीरचं लग्न झालं तेव्हा माझ्या भावना क्रश झाल्या", असं प्राजक्ता हसत गमतीत म्हणाली. अल्ट्रा मराठी बझशी बोलताना पुढे ती म्हणाली, "सिनेमात गश्मीर ऑनबोर्ड आहे, याचा आनंद माझ्यापेक्षा आईला जास्त झाला. कारण, रविंद्र सरांची आई मोठी फॅन आहे". दरम्यान, 'फुलवंती'मधून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन स्नेहल तरडेंनी केलं आहे. या सिनेमात प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, प्रसाद ओक, वैभव मांगले, स्नेहल तरडे, हृषिकेश जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सिनेमातील कलाकारही या सिनेमात झळकले आहेत.