मराठमोळा अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय. या चॉकलेट बॉयचे चाहतेही असंख्य. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या निमित्ताने उमेश सतत चर्चेत असतो. आज उमेश त्याच्या वाढदिवस साजरा करतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत आणि ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
उमेशच्या बर्थ डे निमित्त पत्नी प्रिया बापटनं उमेशचा एका खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत उमेशचे केक कापतानापासूनच प्रियासोबतचं अनेक रोमाँटिक क्षण दिसतायेत. हॅप्पी बर्थ डे माय लाईफ असं कॅप्शन तिनं या फोटोसोबत दिलं आहे. प्रियाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघांमधलं बॉन्डिंग दिसतेय. प्रियाच्या या व्हिडीओ चाहत्यांनी उमेशला वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
प्रिया आणि उमेशची लव्हस्टोरीसहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने खूप अगोदरपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी होकार दिला.
उमेश आणि प्रिया यांच्या वयात आठ वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षांचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर २०११ साली लग्न केले.