Join us

'रस्त्यावर थुंकणे, हॉर्न वाजवणे.., सिव्हिकवर १५० मार्कांचा पेपर पाहिजे', काय म्हणाली अभिनेत्री श्रुती मराठे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 1:05 PM

एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेची ओळख आहे.

अभिनेत्री श्रुती मराठेने आत्तापर्यंत विविध चित्रपट, मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. ती कायमच आपल्या आपल्या बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावामुळे चर्चेत असते. नुकतेच श्रुतीने 'सिव्हिक सेन्स' म्हणजे सार्वजनिक आचरणावर आणि  महिलाच्या ड्रायव्हिंगवर मत मांडलं. 

आरपार नावाच्या एका युट्यूब चॅनलला श्रुतीने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपले अनुभव शेअर केले. ती म्हणाली, आपल्याकडे सिव्हिक सेन्स शिकण्याची गरज आहे. शाळेत असताना नागरिक शास्त्र  नावाचा विषय होता. तो अगदी २० मार्काला होता. इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र हे तिन विषय होते. त्यांचा १५० मार्कांचा पेपर असायचा. पण खरे तर सिव्हिकवर १५० मार्कांचा एक पेपर असला पाहिजे. बीजगणित आणि भूमिती हे शिकून त्याचा पुढे फारसा काही उपयोग होत नाही. पण, 'सिव्हिक सेन्स'चा उपयोग होतो'.

'आपल्याकडे गाडी चालवताना नियमांचे पालन केले जात नाहीत. गाडी उजव्या बाजूला थांबवून, ती डावीकडे वळवली जाते, रस्ता ओलांडताना नियमांचे पालन केले जात नाही', असे ती म्हणाली. तसेच 'सिग्नल लागलेला असताना हॉर्न वाजवणे, रस्त्यावर थुंकणे, हे सगळं का केलं जातं. मी रस्त्यावर थुकंणाऱ्या दोन-तीन रिक्षावाल्यांशी भांडली आहे. एका रिक्षावाल्याला मी थुकंल्यानंतर त्याच्या पाण्याच्या बॉटलने ते साफ करायला लावलं', असेही तिने सांगितलं. 

पुढे ती म्हणाली, 'बायका वाईट गाडी चालवतात, असे एक मत तयार केलं गेलं आहे. पण, असे नाही आहे. मी उत्तम गाडी चालवते. माझे मित्र सांगू शकतील की मी किती व्यवस्थित गाडी चालवते. मी असे म्हणत नाही की गाडी चालवताना बायका चुका करतच नाहीत. पण, त्या चूका तर पुरुषही करतात. हायलाईट फक्त बायकांना केलं जातं. गेल्या १० ते १५ दिवसांत माझी जी काही भांडणे झालीत. त्यात 80 टक्के हे पुरूष होते'. श्रुती मराठे ही एक आघाडीची मराठी अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत तप्तपदी, शुभ लग्न सावधान, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, मुंबई-पुणे-मुंबई २ अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे

टॅग्स :श्रुती मराठेसेलिब्रिटीमराठी अभिनेताटेलिव्हिजनसिनेमामराठी चित्रपट