मराठी अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी तिच्या गोड स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकत असते. अभिनेत्री स्पृहा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. नुकतेच तिने एक पोस्ट शेअर करत पुढील पाच वर्षांचे प्लॅन्स चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
स्पृहा जोशीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने कॅप्शनमध्ये लिहले, 'पुढील पाच वर्षांसाठी माझे प्लॅन्स…'. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सांगते की, मला पुढील पाच वर्षांच्या प्लॅन्सबद्दल जेव्हा कोणी विचारलं, तर मी दिसायला आणखी हॉट होईन. आणखी विचित्रपणा करेन. आणखी श्रीमंत होईन आणि आणखी भयानक होईन. शिवाय आणखी अनपेक्षितही होईन'. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिय दिल्या आहेत.