Join us

हुबेहुब आईसारखीच दिसते! तेजस्विनी पंडितच्या फोटोने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 08:40 IST

आईच्या पावलावर पाऊल टाकत तेजस्विनी अभिनयाच्या दुनियेत आली आणि इथेच रमली.

Tejaswini Pandit : मराठीतील सुंदर आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit ) हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयानं तिने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आईच्या पावलावर पाऊल टाकत तेजस्विनी अभिनयाच्या दुनियेत आली आणि इथेच रमली. तेजस्विनीने नुकतंच एक फोटो शेअर केला ज्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजस्विनी सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तेजस्विनीने दिलेल्या कॅप्शनची चर्चा रंगली आहे. ''आई सारखी दिसते आहे असं वाटलं म्हणून…!!''  असं कॅप्शन तिने याफोटोसोबत दिली आहे. तेजस्विनी शेअर केलेल्या या फोटोवर सेलिब्रेटींसह चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. तेजस्विनीला घडवण्यात आईचा मोठा वाटा आहे. तेजस्विनीच्या वडिलांच्या निधनानंतर ज्योती यांनीच मुलींचा एकटीने सांभाळ केला. आज दोघींनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.

तेजस्विनी अभिनयाशिवाय ती निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. 'बांबू' हा तिचा पहिलाच निर्मित चित्रपट.तसंच 'अथांग' या थरारक वेबसिरीजचीही तिने निर्मिती केली आहे.

टॅग्स :तेजस्विनी पंडित