Join us

उर्मिला कोठारेमध्ये अभिनयासह दडली आहे ही कला, जाणून घ्या कोणती आहे ती कला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 6:37 PM

प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. असाच काहीसा छंद मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिलाही आहे.

कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. असाच काहीसा छंद मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिलाही आहे. 

उर्मिलाला सतत काहीतरी शिकत राहायला फार आवडते. उर्मिला ही उत्तम नृत्यांगना आहे हे आपणास माहित आहेच पण 'एरिअल सिल्क' हा नृत्यप्रकार शिकणारी ती पहिलीच मराठी अभिनेत्री आहे. एरिअल सिल्क डान्सप्रकार.. रोप मल्लखांबाप्रमाणे सिल्कच्या कापडाचा वापर करुन सादर करण्यात येणारा हा खास प्रकार आहे. दोरीऐवजी सिल्कच्या कापडाला धरुन लयबद्ध हालचाली करणे हे याचे विशेष कौशल्य असते. केवळ शारीरिकच नव्हे तर मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी हा प्रकार फार उपयोगी आहे.

'शुभमंगल सावधान', 'आईशप्पथ', 'दुनियादारी', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. यासोबतच मराठी मालिका 'असंभव', 'गोष्ट एका लग्नाची' यामध्येही तिने काम केले आहे. तर 'मायका', 'मेरा ससुराल' या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. लग्नानंतर आता उर्मिला तिचं आईपण एन्जॉय करत आहे. आपल्या मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

टॅग्स :उर्मिला कानेटकर कोठारे