अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आपल्या अभिनय व सौंदर्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीबरोबरच बॉलीवूड चित्रपटातही त्यांनी आपली छाप सोडली. त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या आजही पसंतीस पडतात. नुकतेच वर्षा यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मैत्रिणीबाबतचा खुलासा केला आहे.
वर्षा उसगांवकर यांनी नुकतेच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीतील खास किस्से सांगितले. या मुलाखतीमध्ये त्यांना प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ की सुप्रिया पिळगांवकर यांच्यातील तुमची जवळची मैत्रीण कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डें यांचं नाव घेतलं. निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डें या वर्षा उसगांवकर यांच्या जवळच्या मैत्रिणी आहेत.
८० च्या दशकात निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, अश्विनी भावे आणि प्रिया बेर्डे या सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांचे सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीची गर्दी करायचे. या अभिनेत्रींमध्ये स्पर्धाही पाहायला मिळाली. स्पर्धा म्हटल्यानंतर अभिनेत्रींमध्ये सहसा मैत्री होत नाही. आताच्या काळात कॅटफाईट्स होतात हे आपण पाहतोच. पण, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डें आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील मैत्री आजही टिकून आहे.
वर्षा उसगांवकर यांनी गंमत जंमत, अफलातून, साथी असे अनेक चित्रपटांमधून वर्षा उसगांवकर यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच त्यांना छोट्या पड्यावर देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. आजही त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. सध्या त्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत त्यांनी साकारलेल्या माई या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.