Join us

'Love story.. really life story...', निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्या सोबतचा शेअर केलेला रोमॅंटिक Video होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 3:46 PM

निवेदिता व अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. या जोडीच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

निवेदिता सराफ (Nivedita Ashok Saraf)आणि अशोक सराफ ( Ashok Saraf) ही नावं मराठी सिनेप्रेमींसाठी नवी नाहीत. या नावाला कोणत्याही प्रस्तावनेची गरज नाही. निवेदिता व अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. गेल्या अनेक वर्षांपासून हे जोडपं सुखात नांदतंय. अशात चर्चा आहे ती निवेदिता यांच्या एका पोस्टची. होय, निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासोबत फेका फेकी या सिनेमातील एक जुना व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  या व्हिडिओच्या मागे सामने ये कौन आया दिल में हुई हलचल...हे रोमॅंटिक गाणं बॅगग्राऊंडला सुरु आहे. Love story.. really life story असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओसोबत दिलंय. खूप सुंदर जोडी आहे तुमची, ब्युटीफुल कपल, एव्हरग्रीन, क्लासिक जोडी, लव्हली अशी वेगवेगळ्या कमेंट्स चाहत्यांच्या या व्हिडीओवर येतायेत.

 निवेदिता सराफ  कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या ‘भाग्य दिले तू मला’ (Bhagya Dile Tu Mala) या नव्या मालिकेत दिसतायेत.  या मालिकेत तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे हे कलाकार आहेत. 

अशी सुरु झाली होती अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी अशोक आणि निवेदिता यांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता अवघ्या सहा वर्षांच्या होत्या. अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगावेळी झाली होती. निवेदिता यांच्या वडिलांनी मुलीची ओळख अशोक यांच्याशी करून दिली होती.

कालांतराने निवेदिता यांनीहीदेखील अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. तेव्हा त्यांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. काम करता करता त्यांच्यात छान मैत्री झाली. ‘नवरी मिळेल नवऱ्याला’ सिनेमात दोघांनी काम केलं. सिनेमात काम करताना त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु हे लग्न निवेदिता यांच्या घरच्यांना मान्य नव्हतं. आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये अशी निवेदिता यांच्या आईची इच्छा होती. परंतु निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होता. अखेर घरच्यांनी नमते घेत दोघांच्याही लग्नाला संमती दिली.

टॅग्स :निवेदिता सराफअशोक सराफ