आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करीत अभिनेता आदिनाथ कोठारे(Adinath Kothare)ने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कबीर खानच्या '83' मध्ये रणवीर सिंग सोबत दिलीप वेंगसरकर यांची भूमिका, नागेश कुकुनूरच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये महेश आरवले, प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात दौलतराव देशमाने या रुबाबदार राजकारण्याची दमदार भूमिका साकारणाऱ्या आदिनाथचा मोठा चाहता वर्ग आहे. आदिनाथने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती.
आदिनाथने याशोदरम्यान अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी महेश मांजरेकर यांच्या संबंधीत ही एक किस्सा सांगितला. आदिनाथ म्हणाला, मी त्यांच्या बरोबर ऑल द बेस्ट नाटक करत होतो नुकतंच नाटक आमचं सुरु झालं होतं. नाटकाचे १० ते २० प्रयोग झाले होते. पुण्यात प्रयोग होता. नाटकाचा प्रयोग पिंपरी-चिंचवडच्या बाजूला होता आणि मी प्रभात रोडला राहत होतो. मला निघायला काही कारणामुळे उशीर झाला. मी ट्रॉफिकमध्ये अडकलो होता. त्यादिवशी माझा वाढदिवस होता.
मला महेश दादांचा फोन आला. आदिनाथ कुठेस ?, मी त्यांना म्हणालो जस्ट पोहोचतोय मी. त्यानंतर ते मला खूप ओरडले. पण त्यादिवसानंतर मी नाटकाच्या प्रयोगला दोन तास आधी जाऊन पोहोचायचो आणि ती सवय माझी आजही कायम आहे. मला असं वाटतं ते महेश मांजरेकारांनी मला दिलेले सगळ्यात बेस्ट गिफ्ट होते ते म्हणजे वेळचं महत्त्व.