आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात आला नवा सदस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 9:48 AM
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला नुकताच जन्म दिला आहे. ...
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला नुकताच जन्म दिला आहे. उर्मिला आणि तिचे बाळ दोघेही फिट असून कोठारे कुटुंब या नव्या पाहुण्याच्या आगमनाने प्रचंड खूश झाले आहेत. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची जोडी खूपच आवडते. उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. शुभ मंगल सावधान हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे यांना तो असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. अनेक वर्षं एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११मध्ये लग्न केले.महेश कोठारे यांच्या घरात चिमुकलीचे आगमन झाल्यामुळे सगळेच आनंदित आहेत. या नव्या पाहुण्याच्या स्वागताची सध्या जोरदार तयारी कोठारे कुटुंबात सुरू आहे. उर्मिला तिच्या गरोदरपणात सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्ससोबत सतत संपर्कात होती. ती योगा करतानाचे अनेक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करत होती. तसेच तिने काहीच दिवसांपूर्वी एक फोटो शूट देखील केले होते. उर्मिला तिच्या गरोदरपणात देखील चांगलीच अॅक्टिव्ह होती. तिने या काळात अनेक समारंभात देखील हजेरी लावली होती.