आदिनाथ कोठारे सोशलमीडियावर करत आहे जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2017 6:52 AM
लोकसंख्या, पर्यटन, रक्तदान, स्वच्छता अशा अनेक गोष्टींबाबत जनजागृती सातत्याने होताना दिसत आहे. या गोष्टींची जनजागृती करण्यासाठी सोशलमीडिया म्हणा या ...
लोकसंख्या, पर्यटन, रक्तदान, स्वच्छता अशा अनेक गोष्टींबाबत जनजागृती सातत्याने होताना दिसत आहे. या गोष्टींची जनजागृती करण्यासाठी सोशलमीडिया म्हणा या जाहिराती, नाटक , गाणी अशा बºयाच माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न होताना दिसत असल्याचे पाहायला मिळत असते. मात्र आता, प्रेक्षकांना लाडका कलाकार आदिनाथ कोठारे याने सोशलमीडियावर रक्तदान करा असा संदेश दिला आहे. एवढेच नाही तर त्याने स्वत: ही रक्तदान केले आहे. रक्तदान केल्यानंतर प्राप्त झालेल्या प्रमाणपत्राचा फोटो त्याने सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर कोणत्याही चमत्काराची वाट न पाहता... रक्तदान करा.. जीव वाचवा अशी पोस्टदेखील त्याने अपडेट केली आहे. त्याच्या या आदर्शला सोशलमीडियावरून भरभरून पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर गुड जॉब, अभिमान वाटतो तुझा अशा अनेक कमेंन्टदेखील त्याला मिळताना दिसत आहे. कलाकारांनी केलेल्या जनजागृतीचा नेहमीच समाजात सकारात्मक दृष्टया बदल होत असतो. कारण कलाकारांनी केलेली जनजागृती ही सामान्य लोकांपर्यत पोहोचविण्यास मदत होते. कारण या जनजागृतीच्या बाबतीत कलाकाराला मध्यस्थानी ठेवले तर नागरिक हे लवकर आकर्षित होत असतात. यासाठी कलाकारांनी स्वत:हून घेतलेला पुढाकारदेखील खूप महत्वाचे असते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे अदिनाथ कोठारे असे म्हणण्यास हरकत नाही. त्याचबरोबर त्याने नुकताच संदेश दिला नाही तर त्याने पहिले केले मग सांगितले. त्यामुळे त्याचा हा आदर्श सोशलमीडियावर मोठया प्रमाणात पसंतीस पडला आहे. आदिनाथने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचा माझा छकुला हा चित्रपटदेखील आजही प्रेक्षक विसरले नाहीत. तसेच त्याने मराठी चित्रपटसृष्टीला झपाटलेला २, खबरदार, इश्कवाला लव्ह, पछाडलेला, निळकंठ मास्तर असे अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत.