Join us

तब्बल सोळा वर्षांनंतर सखाराम बाईंडरची टिम पुन्हा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 4:58 PM

सखाराम बाइंडर हे नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. सोळा वर्षांपूर्वी ललित कला कें द्राच्या विदयार्थांनी एकत्र येऊन ...

सखाराम बाइंडर हे नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. सोळा वर्षांपूर्वी ललित कला कें द्राच्या विदयार्थांनी एकत्र येऊन सखाराम बाइंडर  हे नाटक बसविले होते. त्या नाटकाचा एक प्रयोग पुण्यात तर दुसरा प्रयोग दिल्ली मध्ये झाला होता. या नाटकामध्ये महत्वपूर्ण भूमिकेत आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीतील दोन तारे दिसले होते. होय, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि संदीप पाठक या हे दोघांनीही सशक्त भूमिका साकारल्या होत्या. ललित कला केंद्रामध्ये शिक्षण घेत असताना या दोघांनीही या नाटकात काम केले होते. आता  या नाटकाचे पाच प्रयोग तब्बल सोळा वर्षांनी पुन्हा एकदा होणार असल्याचे मुक्ताने सोशलसाईट्सवर सांगितले आहे. याविषयी संदीपने लोकमत सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले कि, मी ललित कला केंद्रामध्ये शिकत असताना आम्ही स्टुडंट्स प्रोडक्शन अंतर्गत सखाराम बाइंडर हे नाटक बसविले होते. या नाटकाचे त्यावेळी दोनच प्रयोग झाले होते. एक पुण्यात आणि दुसरा दिल्लीमध्ये. त्यावेळचा अनुभव खरंच खुप छान होता. आता पुन्हा एवढ्या वर्षांनंतर याच टिमसोबत हे नाटक करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे. त्यावेळी आम्ही अगदी २०-२२ वर्षांचे होतो. तर आता आमच्यातील बरेचसे कलाकार जवळपास ३५-४० वर्षांचे झालेलो आहोत. त्यामुळे आता वयाचा आणि कामाचा देखील बराचसा अनुभव आम्हाला मिळालेला आहे. एका मॅच्युरिटी लेव्हलने हे नाटक पुन्हा एकदा करण्यास आम्ही सज्ज झालो आहोत. तर मुक्ताने फेसबुकवर शेअर केलेल्या  पोस्टमध्ये लिहीले आहे, तब्बल १६ वर्षांनंतर त्याच टीमबरोबर तोच काळ पुन्हा जगताना इतकं सुंदर वाटतंय. आम्ही ललित कला केंद्र मधले सगळे विद्यार्थी पुन्हा एकदा जुन्या एनर्जी नी नव्या जोमात तालिम करतोय.मस्त वाटतंय . रीयुनिअनची ही वेगळीच कल्पना. त्याच टीम बरोबर फेबु्रवारी मधे रंगणार सखाराम बाइंडर चे ५ प्रयोग. बाकी माहिती हळुहळु सांगेनच .