अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपला ठसा उमटविला आहे. शेवटची ती तदैव लग्नम या सिनेमात सुबोधसोबत झळकली होती. यादरम्यान तिने स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतून अचानक निरोप घेतला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. त्यानंतर तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान सध्या ती व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. सध्या सिनेविश्वातून ब्रेक घेत ती भ्रमंती करते आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या प्रवासात ती एकटी नसून तिच्यासोबत तिची मैत्रिणदेखील आहे. ती म्हणजे क्रिएटिव्ह डिरेक्टर नमिता बांदेकर.
सध्या त्या दोघींचे हिमाचल प्रदेश व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्या दोघी व्हॅकेशन खूप छान एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहेत.
वर्कफ्रंटतेजश्री प्रधान सतत चर्चेत येत असते. तिने प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यामुळे चाहते नाराज झाले होते. तिने ही मालिका का सोडली, यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र अलिकडेच तिने शुभंकर एकबोटेसोबत शूटिंग केलं. अभिनेत्याने सेटवरील फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. या प्रोजेक्टसंदर्भातील माहिती समोर आलेली नाही.