Join us

देसी गर्ल प्रियंका चोप्रानंतर धकधक गर्ल माधुरी दीक्षितलाही पडली चंद्रमुखीची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:42 IST

धकधक गर्ल माधुरी दीक्षित चंद्रमुखीच्या प्रेमात पडली आहे. माधुरीने सोशल मीडियावर चंद्रमुखीसाठी खास पोस्ट केली.

चंद्रमुखी’ (Chandramukhi ) या आगामी चित्रपटानं सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. चित्रपटाचा ट्रेलर म्हणा, गाणी म्हणा सगळंच धुमाकूळ घालतंय. आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी चंद्रा आणि ध्येयधुरंदर राजकारणी दौलत देशमाने यांची ही अनोखी प्रेमकहाणी कधी एकदा रिलीज होते, असं चाहत्यांना झालंय. चाहतेच नाहीत तर सेलिब्रिटीही या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत यात आता धकधक गर्ल माधुरी दिक्षीतचा ही समावेश झालायं. माधुरी चंद्रा. अभिनेत्री अमृता खानविलकरच्याचंद्रमुखीच्या प्रेमात पडली आहे..माधुरीने सोशल मीडियावर चंद्रमुखीसाठी खास पोस्ट केलीये.तिनं चंद्रमुखी सिनेमाचं पोस्टर शेअर करत म्हटलंय की, ‘किती अप्रतिम ट्रेलर आहे, मी नक्कीच चंद्रमुखी चित्रपट पाहणार.  माधुरी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच एक्टिव्ह असते. तीचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते जे चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतात. पण तिच्या काळजाचा ठाव चंद्राने घेतला आहे. 

 फक्त माधुरी दीक्षित नाही तर प्रियांका चोप्रा, रितेश देशमुख, कॉमेडी क्वीन भारती सिंह अशा अनेक सेलिब्रिटींनी सिनेमावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय.जोरदार प्रमोशन सुरु असलेला हा सिनेमा 29 एप्रिलला प्रदर्शित होणारे आहे.

 या सिनेमातील चंद्रा हे गाणं सध्या खूपच गाजतयं. या गाण्याची भुरळ अनेक मराठी अभिनेत्रींवर पाहायला मिळालीये. ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा येत्या 29 एप्रिलला चित्रपटगृहांत धडकणार आहे. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीवर आधारित या चित्रपटात अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहेत. प्रसाद ओक याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे तर पटकथा व संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहेत.

टॅग्स :चंद्रमुखीमाधुरी दिक्षितअमृता खानविलकर