भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झालं. रतन टाटा यांच्या निधनाने भारतातील सामान्य नागरिकांपासून ते दिग्गज सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. भारताला आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी रतन टाटा कायमच प्रयत्नशील राहिले. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वाची मोठी हानी झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अशातच मराठमोळा लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने रतन टाटा यांच्याबद्दल मोजक्या पण महत्वाच्या शब्दात त्याच्या भावना व्यक्त केल्यात.
क्षितीजची रतन टाटांना आदरांजली
क्षितीज पटवर्धनने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "रतन टाटा सर. ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली. फक्त मालाची विक्री नाही, मूल्यांची बांधणी केली. पिढ्यांना रोजगारच नाही, तर अगणित स्वप्न दिली, फक्त कंपनीला नाव नाही, तर देशाला कीर्ती दिली. तुमच्या वैचारिक श्रीमंतीला,आणि भौतिक साधेपणाला, तेजःपुंज व्यक्तिमत्वाला, आणि लखलखीत कारकिर्दीला... विनम्र अभिवादन" अशा मोजक्या शब्दात क्षितीज पटवर्धनने रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. क्षितीजने लिहिलेल्या शब्दांचं अनेकांनी कौतुक केलंय.
रतन टाटा यांचं निधन