Join us

दहा वर्षांनंतर पुन्हा ‘रंग्या रंगीला रे’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:06 AM

'पानिपतचे रणांगण' आणि 'अवध्य मी'नंतर योगेश सोमणलिखित 'रंग्या रंगीला रे' हे संजय नार्वेकर याने सशक्त अभिनयातून अजरामर केलेले नाटक ...

'पानिपतचे रणांगण' आणि 'अवध्य मी'नंतर योगेश सोमणलिखित 'रंग्या रंगीला रे' हे संजय नार्वेकर याने सशक्त अभिनयातून अजरामर केलेले नाटक पुन्हा नव्या दमात आणि संचात आणण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पेलले आहे. रसिकांची हसूनहसून पुरेवाट करणारे हे नाटक तब्बल १0 वर्षांनंतर रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. या नाटकाविषयी दिग्पाल करंजीकर सांगतात, की ८ वर्षांपूर्वी या नाटकाने अभिनेता संजय नार्वेकर यांना स्वत:ची ओळख मिळवून दिली. आता नव्या कलाकारांबरोबर हे नाटक रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. इतक्या वर्षात रंगभूमीवरील सादरीकरणामध्ये झालेले बदल लक्षात घेऊन नाटकाच्या संहितेचा वेग कमी होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे. त्याला अनुसरूनच रॉक स्टाईल म्युझिक दिले आहे. मात्र, संहितेमध्ये कोणताही बदल केलेला नाही. खरे तर संजय नार्वेकरांना घेऊनही हे नाटक करता आले असते; पण 'रंग्या'ची छाप नाटकावर नको होती. नवीन कलाकार असले, की प्रयोगही करता आल्याने त्यांनाच प्राधान्य देण्यात आले आहे. योगेश सोमण म्हणतात, की सुमारे १५ वर्षांपूर्वी आलेले हे नाटक म्हणजे निखळ करमणूक आहे. प्रेक्षकांनी यापूर्वीही नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला होता आणि आतादेखील नव्याने येणारे हे नाटक प्रत्यक्ष नाट्यगृहात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत, यातच नाटकाचे यश सामावलेले आहे. या नाटकात 'रंग्या'च्या भूमिकेमध्ये परेश देवळणकर झळकणार असून, सलग दोन वर्षे राज्य नाट्य सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचे रौप्यपदक पटकविणारी माधुरी जोशी रंग्याची नायिका आहे. याशिवाय, आशुतोष वाडेकर, रश्मी देव, आरती पाठक आणि संदीप सोमण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.