Join us

'शेर शिवराज' रिलीज झाल्यानंतर चिन्मय मांडलेकरची प्रेक्षकांना विनंती, म्हणाला - 'कृपया...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 6:13 PM

Chinmay Mandlekar:अभिनेता चिन्मय मांडलेकर याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांना एक विनंती केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या यशानंतर आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.

चिन्मय मांडलेकर याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.  हा व्हिडीओ शेअर करत मायबाप प्रेक्षकांना विनम्र आवाहन असे कॅप्शन त्याने दिले आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला चिन्मयने ‘शेर शिवराज’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रेमासाठी चाहत्यांचे आभार मानले आणि पुढे म्हणाला की, फक्त तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे. कृपया चित्रपट पाहत असताना, चित्रपटाचा शेवट आपल्या मोबाईलवर चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर करू नका. कारण आपले इतर मित्र जे हा सिनेमा पाहणार आहेत. त्यांना तो थरार जसा तुम्ही चित्रपटगृहात अनुभवला आहात तसाच अनुभवू द्या.

‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफजलखानाच्या रुपात मुकेश ऋषी पाहायला मिळत आहेत. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर,ईशा केसकर, रिशी सक्सेना, अशी कलाकारांची तगडी फौज पहायला मिळणार आहे.

टॅग्स :चिन्मय मांडलेकरदिग्पाल लांजेकर