Join us

'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 09:19 IST

Adinath Kothare : बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर आदिनाथ कोठारेने नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

'पाणी'(Paani Movie)च्या हाऊसफुल्ल यशानंतर आता अभिनेता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) पुन्हा एकदा नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी सज्ज झाला आहे. दिवाळी आणि बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर आदिनाथने ही खास घोषणा केली आहे. 'जय मल्हार - आता बळीचं राज्य यनार' (Jai Malhar-Aata Balicha Rajya Yanar)असं या चित्रपटाचं नाव असून त्याने जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेऊन ही खास गोष्ट शेअर केली आहे. 

आधी मानवत मर्डर्सची जोरदार चर्चा असताना आदिनाथने 'पाणी'मधून त्याच्या दिग्दर्शनाच्या प्रवासाला सुरुवात केली आणि आता पाणीला अभूतपूर्व यश, प्रेक्षकांचं प्रेम मिळत असताना, त्याने ही गोड बातमी प्रेक्षकांना दिली आहे. 'पाणी' आणि 'मानवत मर्डर्स' या दोन्ही कलाकृतीने प्रेक्षकांना मोहित केले आहे आणि आदिनाथची नवी कलाकृती बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

२०२६ला रिलीज होणार सिनेमा

या चित्रपटाचा विषय नक्की काय आहे हे लवकरच प्रेक्षकांना समजणार असून यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. हे वर्ष आदिनाथसाठी नक्कीच खास आहे यात शंका नाही. प्रेक्षकांना नेहमीच वैविध्यपूर्ण कलाकृती देणारे कोठारे परिवार आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. २०२६ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येणार असल्याचे देखील समजते आहे. 

आदिनाथ कोठारे म्हणतो.... आदिनाथ कोठारे नव्या चित्रपटाबद्दल म्हणाला की, आता चित्रपटाचा विषय काय ? कोण कलाकार या चित्रपटात दिसणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना समजणार आहेत. दिवाळीच्या खास मुहूर्तावर आदिनाथने प्रेक्षकांना दिवाळीचं गिफ्ट दिलं अस म्हणायला हरकत नाही!

टॅग्स :आदिनाथ कोठारे