वयाच्या ६०व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने घेतले सातफेरे, अशी सुरू झाली Love Story
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 12:15 PM2020-11-27T12:15:04+5:302020-11-27T12:18:09+5:30
सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. लग्नाच्या फोटोंवर या दाम्पत्यला नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छाही दिल्या होत्या.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, या कवितेच्या ओळींप्रमाणे प्रत्येकाचं कुणावर तरी प्रेम असतं किंवा प्रत्येकाची काही ना काही प्रेमाची गोष्ट असते. अशीच काही तरी हटके प्रेमाची गोष्ट अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांचीही हिट ठरली.वयाच्या ६० वर्षी रेशीमगाठीत अडकत अभिनेत्री चाहत्यांना मोठा धक्काच दिला होता. हे अजह गजब लग्न त्यावेळी तुफान चर्चेत राहिले.
हे लग्न थोडं हटके होतं. कारण नव-या मुलाचं वय होते ६५ व वर्षे तर नवरीचे वय ६० वर्षे. या वयात दोघांनी लग्न करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये. यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अतुल गुर्ते यांच्याशी लग्न करत चर्चेत आल्या होत्या. हे लग्न २०११ मध्ये झाले होते. त्यावर्षी याच कपलने सर्वाधिक पब्लिसिटी मिळवली होती. आता पुन्हा एकदा या एव्हरग्रीन कपलच्या त्याच लग्नाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
अतुल हे फिजिसिस्ट असून फेसबुकद्वारे दोघांची ओळख झाली. अनेक प्रसंगात एकमेकांना साथ देत हे दाम्पत्य खर्या अर्थाने त्यांचे आयुष्य एन्जॉय करत आहेत. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. लग्नाच्या फोटोंवर या दाम्पत्यला नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छाही दिल्या होत्या. प्रत्येक गोष्ट वेगवेगळी असते. जीवनात कुठल्याही गोष्टीचे नियम नसतात. दरवेळी निकष वेगवेगळे असतात. हेच यांच्या या लग्नावरून स्पष्ट होते.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सुहासिनी मुळ्ये यांनी सांगितले की,मला आश्चर्य वाटले की इतके वर्षानंतर अचानक माझे लग्न कसे चर्चेत आले? माझे लग्न इतके मोठे प्रकरण नव्हते की लोकांनी यावर चर्चा करावी किंवा मला 'फेमिनिझम आयकॉन' बनवावे. उलट आपण अशा लोकांबद्दल जास्त चर्चा करायला हवी ज्यांनी खरोखर आपल्या कार्याने उदाहरण स्थापित केले आहे. आज आपल्याकडे अशा अनेक व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांचे कार्य लक्षात ठेवून आपण त्यांच्यावर बोलले पाहिजे. मेधा पाटकर, रूणा रॉय, 13 वर्षाची मुलगी जिने नुकतेच एव्हरेस्ट शिखर गाठले. हे खरे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत.