Join us

Video: "हक्काचं वोटिंग चुकवायचं नाही", ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी बजावला मतदानाचा हक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:52 IST

एव्हरग्रीन जोडी ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Maharashtra Election 2024 : राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. राज्यातील २८८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होतं आहे. सामान्य लोकांपासून सिनेसृष्टीतील मोठमोठे कलाकार घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सर्व कलाकार मतदान केल्यानंतर इतरांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत.  मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. 

ऐश्वर्या व अविनाश नारकर हे मतदान करण्यासाठी घराजवळच्या मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.  मतदान करुन बाहेर आल्यानंतर हात उंचावून बोटावरील शाही दाखवली. अविनाश आणि ऐश्वर्या यांनी याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर  शेअर केला आहे. "मतदानाचा मूलभूत अधिकार...", असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं.  या व्हिडीओला त्यांनी  "इलेक्शन आलं इलेक्शन" हे  खास गाणे लावलं आहे. विशेष म्हणजे हे गाणे अविनाश नारकरांचा आगामी चित्रपट 'वर्गमंत्री'मधलं आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याप्रमाणेच  कलाविश्वातील अभिनेता सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अक्षय कुमार, फरहान अख्तर, प्राजक्ता माळी, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख,हेमंत ढोमे, सुकन्या मोने आणि सायली संजीव यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच हे सेलिब्रिटी सामान्य नागरिकांना सुद्धा मतदान करा असं आवाहन करत आहेत. दरम्यान, आज मतदान प्रकिया पार पडल्यानंतर येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर त्याच दिवशी निकाल लागणार आहे. यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन होईल. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४