Join us

विठू माऊलीमधील अजिंक्य राऊत दिसणार 'या' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 7:15 AM

आगामी मराठी चित्रपट 'देवाक काळजी'चा संगीतमय मुहूर्त नुकताच पार पाडला.

आगामी मराठी चित्रपट 'देवाक काळजी'चा संगीतमय मुहूर्त नुकताच पार पाडला. ह्या मुहूर्ताचे विशेष म्हणजे संगीत दिग्दर्शक श्रेयश आंगणे ह्यांनी तब्बल २४ तासांत ४ गाण्यांचे रिकॉर्डिंग पूर्ण केले आहे. श्रेयश ह्यांनी अगोदर गावठी, ट्रकभर स्वप्नं, तिचा उंबरठा ह्या चित्रपटांसाठी संगीत दिलेले आहे. देवाक काळजी चित्रपटासाठी श्रेयशने स्वतः २ गाणी गायली असून इतर दोन गाणी आनंद शिंदे आणि इत्यादी ह्यांच्या मधुर आवाजात सुरबद्ध करण्यात आली आहे.

ह्या मुहूर्तावेळी संगीत दिग्दर्शक श्रेयश म्हणाला "चित्रपटचा आत्मा चित्रपटाच्या कथेसह संगीतात ही असतो. दोघे एकमेकांना पूरक असावे लागतात. माझ्या कारकिर्दीतील देवाक काळजी हा चित्रपट खूप महत्त्वपूर्ण आहे. चित्रपटाचे संगीत खुप छान व दर्जेदार झाले असून प्रेक्षकांनाही ते नक्की आवडेल अशी माझी आशा आहे. रिकॉर्डिंग २४ तासात पूर्ण झाले असले तरी मी ह्या ४ गाण्यांचे कम्पोजिशन, ट्रेकमेकिंग तन्मयतेने मागील अडीच महिन्यां पासून करत होतो.

 देवाक काळजी हा चित्रपट एक संगीतमय प्रेम कथा असून चित्रपटात अजिंक्य राउत , दिव्या पुगांवकर , श्रमेश बेटकर मुख्य भूमिकेत असून नागेश मोर्वेकर, नरेंद्र केरेकर, सागर जाधव आणि डॉ बाबु तडवी हे कलाकार सहायक भूमिकेत दिसतील. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून , देवाक काळजी पुढील वर्षी म्हणजेच  २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :विठुमाऊली