Join us  

Rada: ‘राडा’च्या मोशल पोस्टरची हवा, लवकरच येतोय एक जबरदस्त मराठी सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 11:01 AM

Rada: मराठीला सुद्धा साऊथची भुरळ पडली आहे. होय, साऊथचा तडका असलेला एक जबरदस्त मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाचं नाव आहे ‘राडा’...

आता मराठीला सुद्धा साऊथची भुरळ पडली आहे. होय, साऊथचा तडका असलेला एक जबरदस्त मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाचं नाव आहे ‘राडा’  (Rada)आणि हा ‘राडा’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त राडा घालणार आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन, जबरदस्त कॉमेडी आणि जबरदस्त रोमान्स असा सगळा मसाला असलेल्या ‘राडा’चं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज झालं आणि या मोशन पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळतेय.या चित्रपटातून एक नवा चेहरा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. होय, अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार (Akash Shetty Tuptewar) याचं ‘राडा’मधून सिनेविश्वात पदार्पण होतंय. या चित्रपटाच्या पोस्टरवरचा त्याचा दमदार लुक पाहून सगळेच त्याच्या प्रेमात पडले आहेत. आकाश पहिल्यांदाच अ‍ॅक्शनपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

राम शेट्टी निर्मित ‘राडा’ सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं. या पोस्टरवर रफ अँड टफ, रुबाबदार आणि डॅशिंग शरीरयष्टी असलेला एक हँडसम हंक दिसत आहे.  त्याच्या चेहºयावरील क्रोधाच्या खुणा बघता तो कोणाला तरी योग्य  न्याय देण्याच्या प्रयत्नात असल्याचं जाणवत आहे.   त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडतं? याचा हा राग नेमका कोणाला धडा शिकवण्यासाठी आहे? हे सिनेमा पाहिल्यावरच कळू शकेल. रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिमार्ता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉपोर्रेशन यांचा हा भव्यदिव्य अ‍ॅक्शनपट येत्या 23 सप्टेंबरला सिनेरसिकांच्या भेटीस येतोय.

रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  चित्रपटाच्या संगीताची धुरा दिनेश अजुर्ना व एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर यांचे आहेत. त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर हा सिनेमा के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या अ‍ॅक्शनपटात आता आणखी कोणते कलाकार दिसणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :सिनेमा