Join us

यंदाचे १००वे नाट्यसंमेलनाचे या तारखेला सांगलीत होणार उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 7:39 PM

27 मार्चला सांगली येथे नाट्यसंमेलनाचे उदघाटन होणार आहे. तर 14 जूनला मुंबईत समारोप होईल, असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १००व्या नाट्य संमेलनाकडे नाट्यरसिकांचे लक्ष लागले होते. यंदाचे संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर यंदाचे नाट्य संमेलन मुंबईत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर सांगली येथे नाट्यसंमेलन पार पडणार असून  27 मार्च जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी सांगलीमध्ये यंदाचे 100वे नाट्यसंमेलन होणार असल्याचे माहिती मिळते आहे. तसेच यंदाचे नाट्यसंमेलन हे भांडणे आणि आरोपांशिवाय पार पडावे यासाठी अनेक प्रयत्नही मंडळाकडून घेतले जात आहेत. 

अशी असणार कार्यक्रमाची रूपरेषा

- 25 मार्चला तंजावरला जाऊन व्यंकोजी राजे ह्यांचं पहिले नमन करणार आणि 26 मार्चला सांगलीत नाट्यदिंडी होईल. 

- 27 मार्चला सांगली येथे नाट्यसंमेलनाचे उदघाटन होणार आहे. तर 14 जूनला मुंबईत समारोप  होईल, असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले.

- दरम्यान 27 मार्च पासून 7 जून पर्यंत महाराष्ट्र व्यापी वेगवेगळ्या ठिकाणी छोटी छोटी संमेलन होतील.

विशेष म्हणजे नाट्यसंमेलनाच्या शतकमोहत्सवी वर्षात डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता, दिग्दर्शकाची निवड झाल्याने नाट्यवर्तुळातूनही समाधान व्यक्त केले  गेले. विशेष म्हणजे या वेळी नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी अभिनेते मोहन जोशी आणि जब्बार पटेल अशा दोघांचेच अर्ज आले होते. यात जब्बार पटेल यांची निवड झाली होती. 

डॉ. जब्बार पटेल हे जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आहेत. आजवर त्यांनी अनेक नाटक, चित्रपट यांचे दिग्दर्शन केले आहे. पटेल यांनी मराठीत केलेल्या ' सामना', 'सिंहासन', गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत', 'मुक्ता', पु ल. देशपांडेनी लिहिलेला 'एक होता विदूषक' आदी चित्रपटांचे दिग्दर्शन प्रचंड गाजले. या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :जब्बार पटेल