काही सिनेमे इतके धम्माल असतात की, त्याचे चित्रीकरण करताना त्यामधील कलाकारदेखील त्याची पुरेपूर मज्जा लुटत असतात. आणि त्यामुळेच सिनेमाला सुद्धा एक वेगळा मिडास टच येतो. असच काही झालं आहे अक्षय टंकसाळे आणि निखिल वैरागर या दोन कलाकारांच्या बाबतीत, १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'गॅटमॅट' सिनेमात प्रमुख भूमिका असलेल्या अक्षय टंकसाळे आणि निखील वैरागरने अशीच धम्माल मस्ती सेटवर केली आहे. पुण्यात सिम्बोयसीस ओपन इंटरनेशनल युनिवर्सिटीच्या आवारात या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्याकारणामुळे, या ठिकाणचा मनमुराद आनंद कोणाला घ्यायला आवडणार नाही असच काहीस अक्षय आणि निखिल सोबत सुद्धा झालं. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या प्रशस्त युनिवर्सिटीमध्ये ही दोघं कुठे न कुठेतरी फिरत असायची त्यामुळे, टीमला सतत त्यांना शोधावं लागायचं.
याबद्दल बोलताना 'गॅटमॅट' सिनेमाचे दिग्दर्शक निशीथ श्रीवास्तव सांगतात की,' अक्षय आणि निखीलने संपूर्ण युनिवर्सिटी पिंजून काढली होती. कारण इथे आम्ही शॉट रेडी करत असताना हि दोघं सेटवरून गायब झालेली दिसायची. कॉलेजच्या मुलांसोबत कधी हॉलीबॉल तर कधी फुटबॉल खेळायची, एकदा तर चक्क चालू लॅक्चरमध्ये ही दोघजण जाऊन बसली होती, आणि आम्ही त्यांना शोधण्यासाठी अखंड युनिव्हर्सिटी पालथी घातली होती.
कॉलेज विश्वावर आधारित असलेल्या या सिनेमामध्ये अक्षय आणि निखील महाविद्यालयीन तरुणांच्या भूमिकेत दिसत असून, यात ती तरुण-तरुणींचे 'गॅटमॅट' जुळवून देण्याचं काम करतायेत. त्यांसोबत रसिका सुनील आणि पूर्णिमा डे यांचीदेखील यात प्रमुख भूमिका आहे. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव निर्माते आहेत. कॉलेज विश्वाची रंजक सफर प्रेक्षकांना घडवून आणणार आहे