Join us

"सर्व समस्या, अडचणी आणि आव्हानं...", सिद्धार्थ चांदेकरची आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 18:37 IST

Siddharth Chandekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील चॉकलेट हिरो म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar). त्याने आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याने त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थ चांदेकरने आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, आम्ही सर्व समस्या, अडचणी आणि आव्हानांना असेच सामोरे जातो. कठीण काळाचे आम्ही नेहमी असेच स्वागत करू. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन, #आईचाबर्थडे. सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सिद्धार्थने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाची वाट धरली. त्याने अग्निहोत्र मालिकेपासून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केले आहे. त्याला नेहमीच आईचा पाठिंबा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने त्याच्या आईचे मोठ्या थाटामाटात दुसरे लग्न लावून दिले. त्याच्या या धाडसी निर्णयाचं सर्वत्र कौतुक झाले होते.

वर्कफ्रंट

सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, शेवटचा तो 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटात पाहायला मिळाला. यात तो सई ताम्हणकरसोबत झळकला होता. या सिनेमातून एक आगळीवेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तर याआधी तो 'झिम्मा २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकर