आलोक का गेला डिप्रेशनमध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 10:32 AM
बेनझीर जमादारप्रत्येक व्यक्ती हा आजच्या स्पर्धेच्या युगात उतरण्यासाठी खडतर प्रवास करताना दिसतोे. या प्रवासादरम्यान मिळणारे अपयश, न्यूनगंड, ताण-तणावामुळे ...
बेनझीर जमादारप्रत्येक व्यक्ती हा आजच्या स्पर्धेच्या युगात उतरण्यासाठी खडतर प्रवास करताना दिसतोे. या प्रवासादरम्यान मिळणारे अपयश, न्यूनगंड, ताण-तणावामुळे माणूस हा कोठे तरी हरवत चालला आहे. त्यामुळे त्याला बºयाच मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. या व्यक्तींना पुन्हा जगण्याची उमेद मिळावी या हेतूने दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव कासव असे आहे. या चित्रपटात अभिनेता आलोक राजवाडे आणि इरावती हर्षे हे प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या चित्रपटाविषयी आलोक सांगतो, या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील माझ्या पात्राचे नाव मानस असे आहे. कासव या चित्रपटात मी मानसिक रूग्णाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामध्ये मी मानसिक तणावामध्ये अडकलेला मुलगा दाखविला आहे. तो मुलगा या सर्व मानसिक आजारातून कशा पध्दतीने बाहेर पडतो यावर भाष्य करणारा कासव हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण संपूर्णपणे कोकणात करण्यात आले असून ते पूर्ण झाले आहे. तसेच हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म महोत्सवातदेखील दाखविण्यात आला आहे. आलोक यापूर्वी नाटक आणि चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. तसेच तो रमामाधव, देख तमाशा देख या चित्रपटात झळकला आहे. याचवर्षी आलोक हा अभिनेत्री पर्ण पेठेसोबत लग्नबंधनात अडकला आहे. त्याचबरोबर नुकतेच त्याने व्हाइट रॅबिट रेड रॅबिट हे नाटक केले आहे. या नाटकाला दिग्दर्शक नसतो. या नाटकाच्यावेळी रंगभूमीवरच थेट स्क्रीप्ट मिळते त्यामुळे हे नाटक करणे खूप आव्हानात्मक असते. मात्र आलोकने हे आव्हान पूर्ण केले आहे.