Join us  

१२ वर्षांचं प्रेम पण वाचवायला ५ तास; हटके कहाणी असलेला 'विषय हार्ड'चा भन्नाट ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 5:13 PM

पर्ण पेठेचा नवीन सिनेमा 'विषय हार्ड'चा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (vishay hard)

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषयांवर आधारीत सिनेमे सध्या चर्चेत आहेत. अल्याड पल्याड, नाच गं घुमा, गाभ, संघर्षयोद्धा असे विविध सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.  असाच एक वेगळ्या विषयांवरील हटके सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'विषय हार्ड'. अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणाराही आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 

विषय हार्डचा ट्रेलर रिलीज

'विषय हार्ड' चित्रपटाची कथा ही नेहमीची प्रेमकथा नाही. कारण त्यातील नायक- नायिकेसमोर एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते. त्यांचं १२ वर्षांचं प्रेम आहे आणि वाचवायला फक्त ५ तास आहेत आणि परिस्थितीमधील विचित्र संकटांना तोंड देताना जो गोंधळ उडतो, त्यातून हास्यकल्लोळ निर्माण होतो, त्याचबरोबर काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. हे सर्व प्रसंग अतिशय कलात्मक पद्धतीने एकमेकांत गुंफण्यात आले आहेत. या चित्रपटामधून प्रेक्षकांना मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या रंगांची सफर घडणार आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील परिस्थितीचे चित्रण त्यामध्ये आहे, त्याशिवाय कुटुंब, समाज, राजकारण अशा सर्वच बाजूंना स्पर्श करणारा हा चित्रपट आहे. केवळ तरुणाईच नव्हे तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट आकर्षित करणारा आहे. 

विषय हार्ड मधील कलाकार आणि रिलीज डेट

पर्ण पेठे या कसलेल्या अभिनेत्रीने आपली 'विषय हार्ड'मध्ये नायिकेची भूमिका अतिशय दमदारपणे वठवली आहे. या चित्रपटाद्वारे सुमित हा नवोदित कलाकार लेखक, दिग्दर्शक, नायक आणि निर्माता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. नवोदित असूनही  आपली छाप पाडण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. या दोघांसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्या भूमिकाही उत्कृष्ट झाल्या आहेत.  ५ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याला भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :पर्ण पेठेमराठी भाषा दिन 2020