Join us

अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी दिसणार हिंदी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 9:26 AM

निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ ही जोड गोळी मराठी इंडस्ट्रित तशी सर्वांनाच परिचयाची आहे. आता हे दोघे लवकरच आपल्याला ...

निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ ही जोड गोळी मराठी इंडस्ट्रित तशी सर्वांनाच परिचयाची आहे. आता हे दोघे लवकरच आपल्याला एका हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. निपुण आणि अमेयची जोडी एका हिंदी चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहे. आकर्ष खुराना या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. पहिल्यांदाच हे दोघे चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात काम करणारे सगळे कलाकार नाटक आणि वेबसिरिजमध्ये काम करणारे आहेत असे समजतेय.या आधीही अमेयने हिंदीमध्ये काम केले आहे. हिंदीत काम करताना अमेयला मजा आल्याचे समजतेय. निपुण धर्माधिकारीने बापजन्म या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तसेच त्यांने देखील अभिनय केला आहे. नुकतीच अमेयची कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये निपुणने लिहिले आहे की, कामाला प्राधान्य देणारे आणि त्याबद्दल प्रामाणिक असलेले लोक फार कमी बघायला मिळतात. अशा लोकांच्या संगतीत राहायला बरं वाटतं आणि त्यांचा अभिमानही वाटतो. काल रात्री उशिरा आजोबांचे निधन होऊन, आज पहाटे आणि दिवसा सगळे क्रियाकर्म आटपून दुपारी दुसऱ्या गावी जाऊन 'अमर फोटो स्टुडिओ'चा प्रयोग करणाऱ्या अमेय वाघला सलाम. अमेय वाघच्या आजोबांचे नुकतेच अचानक निधन झाले आणि त्यानंतरही कामाला प्राधान्य देत अमेय नाटकाच्या प्रयोगासाठी अंत्यविधीनंतर लगेचच हजर झाला. त्याच्यामुळे प्रयोग रद्द होऊ नये म्हणून आपले दुःख बाजूला ठेवून तो नाटकाच्या प्रयोगाला हजर झाला.अमेय वाघ सध्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याच्या अभिनयावर सगळेच फिदा आहेत. त्याने आजवर फास्टर फेणे, मुरंबा, शटर, पोपट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अमेय वाघचा सिनेसृष्टीपर्यंतचा प्रवास अतिशय इंटरेस्टिंग आहे. अमेयने आपल्या करिअरची सुरुवात नाटकापासून केली. बालनाट्यापासून सुरुवात करता करता अमेय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवू लागला आणि पुढे त्याने व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले