Join us

Amey Wagh: अमेय वाघनं शेअर केला फोटो, कियारा आणि विकी कौशल कमेंट करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 18:49 IST

सध्या अमेयची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावर चक्क कियारा अडवाणी आणि विकी कौशलने कमेंट केली आहे.

अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh ) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरातल्या तरूणाईला अमेय वाघची ओळख झाली. पुढे फास्टर फेणे, मुरांबा यासारख्या त्याच्या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावलं आणि नंतर वेबसीरिजमधून त्याने हिंदी मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण केलं. अमेय जितका उत्तम अभिनेता आहे, तितका उत्तम विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. त्याच्या पोस्ट वाचल्यावर तुम्हालाही हे पटेल. सध्या अमेयची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावर चक्क कियारा अडवाणी आणि विकी कौशलने कमेंट केली आहे.  

लवकरच अमेय  'गोविंदा नाम मेरा'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमेय रिक्षामध्ये बसला असून त्याच्यासोबत अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे. या फोटोसोबत अमेयने लिहिलं की, गोविंदा, गोविंदा की गर्लफ्रेंड आणि गोविंदाचा मित्र!  

अमेयच्या पोस्टवर कमेंट करत विकी कौशल ने लिहिलं, लव यू ब्रो, तर कियारानं लिहिलं, एक मिठी कौस्तुभला. याशिवाय अनेक मराठी कलाकरांनी देखील यावर कमेंट्स केल्या आहेत. गोविंदा नाम मेरा मध्ये अमेय वकिलाची भुमिका साकारतोय. शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केलेला आणि करण जोहरने निर्मित केलेला गोविंदा नाम मेरा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

टॅग्स :अमेय वाघकियारा अडवाणीविकी कौशल