Join us

Jaggu Ani Juliet Trailer : तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी....! ‘जग्गू आणि जुलिएट’चा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 6:06 PM

Jaggu Ani Juliet Trailer :  ३ मिनिटे ६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अमेय वाघचा एकदम हटके अंदाज पाहायला मिळतो.

Jaggu Ani Juliet Trailer : सगळ्यांचा लाडका अभिनेता अमेय वाघ ( Amey wagh) आणि लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी ( Vaidehi Parshurami) यांचा ‘जग्गू आणि जुलिएट’ हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अजय-अतुल यांचं वेड लावणार म्युझिक, महेश लिमयेंचं जबरदस्त दिग्दर्शन आणि अमेय वाघ-वैदेही या सुपरक्यूट जोडीची सुपरक्युट केमिस्ट्री पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.अमेय आणि वैदेहीच्या एका सीनने ट्रेलरची सुरूवात होते.

 ३ मिनिटे ६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अमेय वाघचा एकदम हटके अंदाज पाहायला मिळतो. चित्रपटात अमेय वाघ हा वर्सोव्यामधील एका आग्री-कोळी मुलाची अर्थात जग्गूची भूमिका साकारत आहे. तर वैदेही ही ज्युली नावाच्या उच्चशिक्षीत मुलगी दाखवण्यात आली आहे.

गळ्यात सोनसाखळ्या, ‘Rich’ असं लिहिलेलं भलं मोठं पेंडंट असा कुल जग्गू अवतीभवतीच्या म्हातार्या लोकांसोबत राहून जाम कंटाळला आहे. तो तात्यांना फोन करून बाहेर एकटा फिरायला जायची परवानगी मागतो. तात्याही सोन्याची शपथ घेऊन त्याला परवानगी देतात. जग्गू ट्रीपवर बाहेर पडतो आणि इथेच त्याच्या ज्युलिएटची एन्ट्री होते. तिची इंग्लिश ऐकून जग्गूचे डोळेच फिरतात. पण तिला मराठीही बोलता येतं, हे कळल्यावर जय महाराष्ट्र म्हणत तो तिला थेट मिठीच मारतो. जग्गू व ज्युलिएटवरच्या गाण्याची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. पुढं काय होतं, यासाठी अर्थातच सिनेमा प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘जग्गू आणि जुलिएट’चा ट्रेलर भन्नाट आहे. यातली कॉमेडी, डायलॉग सगळंच भन्नाट आहे. वैदेही व अमेयची केमिस्ट्रीही तुफान आहे. महेश लिमये 'जग्गू आणि जुलिएट' या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.   

टॅग्स :अमेय वाघवैदेही परशुरामीमराठी अभिनेतामराठी चित्रपट