Join us

आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 1:14 PM

Amhi jarange: येत्या १४ जून रोजी 'आम्ही जरांगे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमात अभिनेता मकरंद देशपांडे मुख्य भूमिका साकारत आहेत. तर, आता अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेवरील पडदा सुद्धा दूर झाला आहे. 

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत आहेत. यामध्येच त्यांची संघर्षगाथा उलगडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १४ जून रोजी 'आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सिनेमाशी निगडीत अनेक अपडेट समोर येत आहेत. यामध्येच या सिनेमातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेत एक लोकप्रिय अभिनेता झळकणार आहे.

येत्या १४ जून रोजी 'आम्ही जरांगे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमात अभिनेता मकरंद देशपांडे मुख्य भूमिका साकारत आहेत. तर, आता अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेवरील पडदा सुद्धा दूर झाला आहे. 

अण्णासाहेब पाटलांच्या भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता

मराठा समाजाचे पहिले नेता अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेत अभिनेता अजय पूरकर यांना पाहायला मिळणार आहे. अण्णासाहेब पाटील यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व होतं. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अजय पुरकर यांची निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत अण्णासाहेब पाटील?

अण्णासाहेब पाटील हे मराठा समाजाच्या हक्कासाठी लढा देणारे पहिले नेता आहेत. त्यांनी मराठ्यांसह माथडी कामगारांचे प्रश्न आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या हक्कासाठी सुद्धा लढा दिला. त्यामुळे मराठा समाजाचे पहिले नेता म्हणून अण्णासाहेब पाटील यांच्याकडे पाहिलं जातं.

दरम्यान,  या सिनेमाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं असून नारायणा प्रोडक्शन अंतर्गत या सिनेमाची निर्मिती झाली आहे.

टॅग्स :सिनेमाअजय पुरकरसेलिब्रिटीमराठी अभिनेता