राज्यभर 'शिवपुत्र संभाजी' या नाटकाचे प्रयोग दणक्यात सुरु आहेत. खासदार आणि डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे मुख्य भूमिकेत आहेत. प्रयोगावेळी अमोल कोल्हेंचा अपघात झाला. त्यांना दुखापत झाली होती.अपघात झाल्यानंतर काही दिवस प्रयोगांना विश्रांती दिलेली आहे. ही घटना घडण्याआधी कोल्हे यांनी कोल्हापुरात ६ एप्रिलला शिवपुत्र संभाजी नाटकाचा एक प्रयोग केला होता. या प्रयोगाच्या आधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये एक चिमुकला अमोल कोल्हे यांना भेटायला येतो आणि त्याला बघता क्षणी अमोल कोल्हे त्याच्या पायाला हात लावून पाया पडतात. असं का घडलंय की अमोल कोल्हे या चिमुकल्याचा पाया का पडले हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांचं शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. कोल्हापूरच्या प्रयोगाच्या आधीच हा व्हिडीओ शेअर करताना डॉ. अमोल कोल्हे यांना टॅग केलं आहे. अमोल कोल्हे मंचावर उपस्थित असा एक महिला आपल्या चिमुकल्याला घेऊन स्टेजवर आल्या. या बाळाचा पेहराव पाहून अमोल कोल्हे यांनी बाळाला खाली वाकून मुजरा केला आणि त्याच्या पाया पडले. हे पाहून उपस्थित सगळे भारावून गेले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, शिवपुत्र संभाजी हे नाटक फार कमी वेळात लोकप्रिय झालं आहे. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. अमोल कोल्हेंचा अपघात झाल्याचं कळताच चाहते आणि त्यांचे हितचिंतक चिंतेत होते. मात्र कोल्हे यांनी स्वत:च काळजी करण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. तसंच आपल्या पुढच्या प्रयोगाविषयीही माहिती दिली आहे.
फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले होते,"काळजी करु नका! पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं! थोडीशी सक्तीची विश्रांती...परंतू दुखापत फार गंभीर नाही.लवकरच भेटू "11 मे ते 16 मे" हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे *"शिवपुत्र संभाजी"* महानाट्य!!! धन्यवाद.