'राझी', 'सत्यमेव जयते' चित्रपट व 'डॅमेज' या वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अभिनेत्री अमृता खानविलकर आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 'पाँडिचेरी' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर करणार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सिनेमा स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आला आहे.
'पाँडिचेरी' चित्रपटात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर व वैभव तत्ववादी दिसणार आहेत. या चित्रपटात अमृताची वर्णी लागल्याचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले. त्यांनी अमृताचा फोटो शेअर करून लिहिले की, या टॅलेंटेंड मुलगी आमच्या 'पाँडिचेरी' चित्रपटात जोडली गेली आहे. या सिनेमाचे शूटिंग स्मार्टफोनवर केले जाणार आहे. अमृता तू या चित्रपटात जोडली गेल्यामुळे मी खूप खूश आहे. चित्रपटातील कलाकारांची निवड पूर्ण झाली असून या चित्रपटातील तिन्ही कलाकार शूटिंगसाठी सज्ज झाले आहेत. यातील चौथे महत्त्वाचे पात्र म्हणजे शहर. सई ताम्हणकर आणि वैभव तत्त्ववादी ह्यांच्यासोबत अमृता खानविलकर 'पाँडिचेरी' ह्या चित्रपटात तीसरी महत्वाची भूमिका साकारणार . अमृताचे मनापासून स्वागत. कास्टिंग ची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आनंद !
शीर्षकावरुनच या सिनेमाची कथा पॉण्डेचेरीशी संबंधित असणार आहे. खुद्द सचिनने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. एरव्ही मुंबई, पुणे, कोकणात मराठी सिनेमांचे शुटिंग होते. मात्र सचिनच्या या सिनेमाचे शुटिंग निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाँडिचेरीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सचिनने दिली आहे. मात्र या पलीकडे आणखी एक खासियत सचिनच्या या सिनेमात आहे. सचिनचा हा सिनेमा पूर्णपणे स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात येणार आहे. स्मार्टफोनवर शुटिंगचा हा अनुभव सचिनसाठी पहिलाच असणार नाही. कारण याआधी त्याने गुलाबजाम या सिनेमाचा सुरुवातीचा सीन स्मार्टफोनवरच चित्रीत केला होता. मराठी सिनेमांमधून वेगळेच समाधान मिळते असे सचिनने स्पष्ट केले आहे. तसेच आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत झळकलेली सई आणि वैभवची केमिस्ट्री अनुभवणे प्रेक्षकांसाठी एक ट्रीटच असणार आहे.