Join us

Anant Radhika wedding: मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या 'या' अभिनेत्रीला अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 13:56 IST

अंबानी कुटुंबासह सिनेसृष्टीत एका लग्नाची बरीच लगबग सुरु आहे.

अंबानी कुटुंबासह सिनेसृष्टीत एका लग्नाची बरीच लगबग सुरु आहे. अउद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आलं आहे. इतकचं नव्हे तर या लग्नसोहळ्यासाठी आता एका मराठी अभिनेत्रीला देखील या सोहळ्याचं आमंत्रण आलं आहे. 

अभिनेत्री अमृता खानविलकर हिला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचं आमंत्रण आलंय. आतापर्यंत झालेल्या या सगळ्या प्री-वेडिंग कार्यक्रमांमध्ये बॉलिवूडच्या तसंच क्रिकेट विश्वातल्या सेलिब्रिटींची गर्दी पाहायला मिळाली होती. यात मराठी इंडस्ट्रीतले कलाकार मात्र दिसले नाहीत. पण आता मराठी अभिनेत्रीला मुकेश अंबानी यांच्या लेकाच्या लग्नाची पत्रिका आली आहे. 

राधिका आणि अनंत अंबानी यांच्या लगा प्री-वेडिंग कार्यक्रम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहेत. यापूर्वी, जामनगर तसंच इटलीतही काही सोहळे पार पडले. आता लवकरच दोघांचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहे. अमृता या लग्न सोहळ्यात सहभागी होणार का? ही उत्सुकता सगळ्यांना आहे. राधिका आणि अनंत अंबानी यांचा लग्न सोहळा 12 ते 15 जुलै रोजी संपन्न होणार असून अनेक बडे कलाकार सुद्धा याला उपस्थित राहणार आहेत.  

टॅग्स :अमृता खानविलकरसेलिब्रिटीबॉलिवूडमराठी अभिनेतामुकेश अंबानीअनंत अंबानी