ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या अमृता खानविलकरचे सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतोय. त्याला कारणीभूत आहे तिचे इन्स्टाग्रामवरचे फोटो.
सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
तसेच ती 'पाँडिचेरी' सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती दिग्दर्शक सचिन कुंडलकर सोबत पहिल्यांदाच काम करणार आहे. 'पाँडिचेरी' सिनेमात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर व वैभव तत्ववादी आणि नानी कुलकर्णी दिसणार आहेत.