Join us

हॉट आणि स्पोर्टी लूक पाहून चाहते झाले घायाळ, ओळखलंत का या मराठमोळ्या अभिनेत्रीला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 07:15 IST

सध्या ती बल्गेरियामध्ये ‘खतरों के खिलाडी 10'च्या शूटिंग गेली आहे. या शोचे अँकरींग दिग्दर्शक रोहित शेट्टी करणार आहे.

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ही ती अपलोड करत असून रसिकांची प्रशंसा मिळवताना दिसते. अमृता सध्या बल्गेरियामध्ये ‘खतरों के खिलाडी 10'च्या शूटिंग गेली आहे. या शोचे अँकरींग दिग्दर्शक रोहित शेट्टी करणार आहे. खतरों के खिलाडीमध्ये करण पटेल, अदा खान, करिश्मा तन्ना, आर जे मलिश्का, कोरियोग्राफर धर्मेश व काही सेलिब्रेटी दिसणार आहेत. मात्र हा शो पाहण्यासाठी चाहत्यांना २०२० पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

काही दिवसांपूर्वी अमृताने सोशल मीडियावर तिचा एक स्पोर्टी लूकमधला फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती भलतीच हॉट दिसतेय. तिच्या फॅन्सना तिचा हा लूक आवडला आहे. अमृताच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलायं. 

अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.  मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं.लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :अमृता खानविलकर