मुंबई पोलिसांचे क्रिएटीव्ह पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. मुंबई पोलीस विनोदी मार्गाने भन्नाट पोस्ट शेअर करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करतात. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित 'हिरामंडी' वेबसीरिजमधील एका डायलॉगचा वापर करत नागरिकांना एक खास संदेश दिलाय. त्याबद्दल सारेच मुंबई पोलिसांचं कौतुक करत आहेत. मुंबई पोलिसांची ही पोस्ट अभिनेत्री अमृता खानविलकरने शेअर केली आहे.
अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतेच तिनं मुंबई पोलिसांची एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. मुंबई पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "एक बार देख लिजिये, दिवाना बना दिजीये, चलन काटने के लिए, तैय्यार है हम, तो हेल्मेट पेहेन लिजिये", पुढच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "पुराने पासवर्ड दोहरे नहीं जाते, भुला दिए जाते है", "ओटीपी बताने और बर्बाद होने के बीच मैं कोई फरक नहीं होता". मुंबई पोलिसांच्या क्रिएटिव्हची अमृता फॅन झाली. तिने थेट मुंबई पोलिसांची पोस्ट शेअर करत 'मुंबई पोलिस गॉट नो चिल्ल... उफ्फ ये अदाये' असं म्हटलं.
सध्या सोशल मीडियावर अमृताची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. मुंबई पोलिसांचं हे क्रिएटीव्ह पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं असून, ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तिची लुटेरे ही वेबसीरिज रीलिज झाली. याशिवाय ती 'चाचा विधायक है हमारे ३', 'कलावती', 'ललिता बाबर', 'पठ्ठे बापूराव' यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर अमृताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.