मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सोशल मीडियावर सक्रीय आहे. या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता तिची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे. अमृता खानविलकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या मावशीचे निधन झाले आहे. अमृताने मावशीचा फोटोसोबत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
अमृता खानविलकर हिने इंस्टाग्रामवर मावशीचा फोटो शेअर करत लिहिले की, आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही. मनसोक्त आईसक्रीम खा .... छान रहा .... नीट रहा..आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील. तू परत लहान होऊन जा...तू आजपर्यंत जे जे केलस घरच्यांनसाठी .... आमच्या कुटुंबासाठी त्याची परत फेड आम्ही कोणी करूच शकत नाही. मम्मा ... मी ... अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो माऊ तुला खूप मिस करणार ग तुला .... खूप...अजून आपल्याला किती फिरायचं होतं..बोलायचं होतं .... मॉम ला …मला तुला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं. पण माऊ तू नीट राहा आता तू काळजी करू नकोस.