मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बऱ्याचदा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. मात्र यावेळेला तर तिने सोशल मीडियावरील आपल्या चाहत्यांना चकीत केले आहे. नेहमी ग्लॅमरस फोटो टाकणाऱ्या अमृताने योगा पोजमधील फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना चकीत केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अमृता खानविलकरने नुकतेच इंस्टाग्रामवर योगा पोजमधील व्हिडीओ शेअर करत लिहिले होते की, नवीन सीरिज, लवकरच येणार. या पोस्टमधून लक्षात येते आहे की अमृता योगा पोझमधील फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रेरीत करणार आहे.
अमृता खानविलकर योगाचे धडे रसिका क्षिरसागरकडून गिरविते आहे. तिने योगा पोझमधील फोटो शेअर करत म्हटले की, तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही मजबूत असता. असे माझ्या शिक्षिका सांगतात. रसिका क्षिरसागर मी तुझी आभारी आहे माझ्यासोबत असण्यासाठी आणि मला प्रशिक्षण देण्यासाठी.