Join us

"१० दिवस झाले पण एक दिवसही.."; जिगरी मित्र अतुल परचुरेंच्या निधनामुळे सुनील बर्वेंची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 11:34 AM

अतुल परचुरेंच्या निधनामुळे भावुक झालेल्या सुनील बर्वेंनी पोस्ट केली आहे (atul parchure, sunil varve)

काही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचं दुःखद निधन झालं. अतुल परचुरेंच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वातील एक तारा निखळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अतुल परचुरेंच्या अंत्यदर्शनाच्या वेळी अनेक कलाकार भावुक झालेले दिसले. याशिवाय सर्व कलाकारांनी शोक व्यक्त करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अतुल परचुरेंचे खास मित्र आणि मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेते सुनिल बर्वेंनी यांनी लाडक्या मित्राने जगाचा निरोप घेतल्यावर त्यांच्या खास भावना शेअर केल्यात.

सुनिल बर्वेंची अतुल परचुरेंसाठी भावुक पोस्ट

सुनील बर्वेंनी अतुल परचुरेंसोबत खास फोटोशूट करत लिहिलंय की, "आज दहा दिवस झाले! एक दिवसही तुझ्या आठवणी शिवाय गेला नाही! आणि इथून पुढील सगळे दिवस…. जवळ जवळ ३९ वर्षांची आपली मैत्री!! दीड महिन्यांचा अमेरिका दौरा सोडला तर सलग इतके दिवस तू माझी किंवा मी तुझी आठवण काढायचं काही कारणंच नव्हतं.  सुयोगच्या त्या अमेरिकेच्या दौऱ्याहुन परतल्यावर आपण म्हंटलं होतं, आता वर्षभर तरी तोंडं नको पाहूया! पण आता तू असं काहीतरी केलंयस, की रोज येणार रे तुझी आठवण!"

सुनील बर्वे पुढे लिहितात की, "माझ्या पहिल्या नाटकापासून तुझ्या शेवटच्या नाटका पर्यंतची आपली मैत्री, केवळ आनंददायी! कधीही न विसरता येणारी! कधीही भरून न काढता येणारी! पण मनापासून सांगतो, जरा घाई केलीस यार!! फोटोरूपी आठवणी मोजक्याच आहेत, (आपल्या काळी का नव्हते मोबाईल कॅमेरे?) त्यातल्या त्यात आपल्या सूर्याची पिल्लेच्या फोटोशूटच्या वेळेचे काही गोड क्षण!!"

टॅग्स :अतुल परचुरेसुनील बर्वेमराठीमराठी अभिनेता