Join us  

आनंद इंगळे या बॉलिवुड चित्रपटात झळकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2017 10:37 AM

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आनंद इंगळे हा लवकरच एका बॉलिवुड चित्रपटात झळकणार आहे. तो डॅडी या ...

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आनंद इंगळे हा लवकरच एका बॉलिवुड चित्रपटात झळकणार आहे. तो डॅडी या चित्रपटात दिसणार असल्याचे समजत आहे. या चित्रपटाची कथा अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती गुफंण्यात आली आहे. या चित्रपटात बॉलिवुडचा तगडा कलाकार अर्जुन रामपाल  हा अरूण गवळीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मात्र मराठमोळा कलाकार आनंद इंगळे याची भूमिका काय असणार आहे हे अदयापदेखील कळाले नाही. आनंद इंगळे यांच्यासोबत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मोनालिसा बागलदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. बॉलिवूड चित्रपटातून गुन्हेगारी विश्वातील अनेक व्यक्तीच्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. रामगोपाल वर्मा यांच्यापासून ते थेट रोमाँटिक चित्रपटासाठी ख्यात असलेल्या यशराज व धर्मा प्रोडक्शन यांनी देखील गुन्हेगारी विश्वाशी संबंधित व्यक्तीवर चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता मुंबईतील प्रसिद्ध दगडी चाळवर चित्रपट तयार करण्यात येत असून त्यात दडलेली अरुण गवळीची गुन्हेगारी दुनिया डॅडी या चित्रपटातून दाखविली जाणार आहे. काही दिवसापूर्वी अर्जुनने त्याच्या ट्विटरवरून त्याचा फर्स्ट लुकही शेअर केला आहे. त्याने ट्विटरवर अरुण गवळीचा तरुणपणीचा फोटो शेअर केला. त्याचबरोबर त्याचाही चित्रपटातला लुक त्याने दाखवला आहे. हे दोन्ही फोटो पाहताना त्यांच्यात फारच साम्य दिसून येते. इटलीतील रंगभूषाकाराने अर्जुनच्या रंगभूषेचे काम हाती घेतले असल्याचे समजत आहे. अशा या बिगबजेट चित्रपटात आनंद इंगळे यांची भूमिका काय असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक झाले आहेत.