Join us  

अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये चंद्रमुखीचा जलवा, अमृता खानविलकरच्या ग्लॅमरपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 8:49 AM

अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दिसली मराठमोळी चंद्रमुखी, बॉलिवूड अभिनेत्रींना सोडून अमृता खानविलकरवर खिळल्या नजरा

Anant Ambani Radhika Merchant Wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. त्यानंतर अनंत-राधिकाचं वेडिंग रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अनेक मराठी सेलिब्रिटींनाही अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनचं आमंत्रण होतं. मराठमोळी अमृता खानविलकरनेही अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती. 

मराठमोळ्या अमृता खानविलकरने तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला अमृताने हाय स्लिट आणि डीप नेक शिमरी ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केला होता. केसाचा बन बांधून आणि गळ्यात खड्यांची ज्वेलरी घातलेल्या अमृतावर सगळ्यांचं नजरा खिळल्या होत्या. या रिसेप्शन पार्टीतील अमृताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटने १२ जुलैला विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. गेले कित्येक दिवस अंबानी कुटुंबीयांच्या या वेडिंग सोहळ्याचीच चर्चा सुरू आहे. अनंत-राधिकाच्या वेडिंगला बॉलिवूडबरोबरच हॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. वेडिंग सोहळ्यानंतर रिसेप्शन पार्टीनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.  

टॅग्स :अनंत अंबानीअमृता खानविलकरसेलिब्रेटी वेडिंगमुकेश अंबानी