Join us

'...आणि आईनं मला झाडूनं मारलं', संस्कृती बालगुडेनं सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 11:54 AM

Sanskruti Balgude : अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नुकताच 'चौक' हा चित्रपट रिलीज झाला.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) हिने मालिका आणि चित्रपटात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. तिचा नुकताच चौक हा चित्रपट रिलीज झाला. संस्कृती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेतही येते. दरम्यान नुकतेच तिने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत तिच्या शालेय जीवनातील मजेशीर आठवण शेअर केली आहे.

संस्कृती बालगुडे हिने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत तिला तू पहिली शिवी कधी दिलीस असा प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, मी पहिली शिवी आईसमोर दिली होती. ती मी आईला नक्कीच दिली नव्हती. कारण आईला शिवी देणे शक्यच नाही. माझ्याच तेवढी हिंमतही नाही. पण त्यावेळी मला एका दुसऱ्याच व्यक्तीचा राग आला होता. त्याला मी ती शिवी दिली होती आणि तेव्हा नेमकी माझी आई माझ्यासमोर बसली होती आणि तिने ते ऐकले.

आणि मला बेदम मारले...

ती पुढे म्हणाली की, तो शब्द ऐकल्यावर आईने एक मोठा पॉज घेतला आणि मग तिने मला विचारले काय म्हणालीस तू ? परत बोल. तेव्हा माझ्या तोंडून तो शब्दच बाहेर येईना. आईने बाजूला असलेला झाडू घेतला आणि मला बेदम मारले. मला अजून आठवते की आमच्या बेडवर मी इकडून तिकडे पळत होते आणि आई मला झाडूने मारत होती.

वर्कफ्रंट...

संस्कृती बालगुडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने तिच्या कारकीर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. तिने टेक केअर गुड नाईट, सांगते ऐका, निवडुंग, फ्रेंडशिप अनलिमिटेड, भय या चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :संस्कृती बालगुडे