रितेश देशमुख (Riteish Deshmukh) - जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved Marathi Movie) हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी (३० डिसेंबर) प्रदर्शित होतो आहे. रिलीजआधीच या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. नुकताच या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. त्यावेळी उपस्थित असलेल्या कलाकारांवरही या चित्रपटाने चांगलीच भुरळ घातली आहे. दरम्यान अभिनेता जितेंद्र जोशीनेवेड चित्रपट पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया मांडली आहे.
जितेंद्र जोशीने इंस्टाग्रामवर रितेश आणि जिनिलियासोबत फोटो शेअर करत लिहिले की, आज वेड चित्रपट पाहिला आणि वेड लागलं!! रितेश भाउंचं दिग्दर्शनात पदार्पण होतंय परंतु आपला ५० वा चित्रपट करावा या सफाईने आणि बारकाव्या ने त्यांनी दिग्दर्शन केलंय आणि अभिनय सर्वोत्तम केलाय. जेनीलिया देशमुख यांच्या कडून त्यांच्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम काम काढून घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. शुभंकर तावडे च्या प्रामाणिक कामाला तोड नाही. रवी राज ने त्याच्या पहिल्याच सिनेमात साकारलेला खलनायक अप्रतिम . जिया शंकर सुद्धा उत्तम परंतु या चित्रपटात असलेल्या खुशी नावाच्या अगदी नावाप्रमाणेच असलेल्या चिमुरडी ने मला खरोखर वेड लावलं. बाकी अशोक मामांविषयी मी काय बोलू? ते करू शकत नाहीत असा कुठलाही रोल नाही. या वयात, इतके सिनेमे केल्यानंतर देखील मला थक्क करून सोडलं त्यांनी!!